मागे जा

पाणी टंचाई प्रश्न सोडविला – बोअरवेल शुभारंभ


प्रभाग क्रमांक २६ व २७ मध्ये नागरिकांची पाणी टंचाईची
दीर्घकालीन समस्या सोडविण्यासाठी बोअरवेल
उभारणी व पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ करण्यात आला.

रवींद्रनाथ टागोर वाचनालय परिसर,
हत्ती चौक परिसर, बावने गल्ली परिसर,
किशोर हॉटेल कागवडे मळा,
खानाज गल्ली परिसर व राणी बाग परिसर
अशा एकूण ६ ठिकाणी कुपनलिका (बोअरवेल)
शुभारंभ करण्यात आला.

हा शुभारंभ कार्यक्रम
मा. आमदार सुरेश हाळवणकर साहेब,
मा. नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी वहिनी,
नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर,
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कामामुळे परिसरातील नागरिकांना
नियमित व पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा
उपलब्ध होऊन पाणी टंचाईवर कायमस्वरूपी
उपाय मिळणार आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय