मागे जा

स्वच्छता अभियान – सार्वजनिक परिसर स्वच्छता


इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी
जनता बँक, शॉपिंग सेंटर, शिवाजी उद्यान,
शाह मार्केट, कल्पना टॉकीज या परिसरात
घाण साचण्याच्या समस्या निर्माण होत होत्या.

त्याअनुषंगाने प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत
नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत
विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानादरम्यान स्वच्छता कामगार,
कंत्राटदार, मटेरियल वाहतूकदार,
विभाग क्रमांक १२ व विभाग क्रमांक ५ चे
सॅनिटरी ऑफिसर यांच्या सहकार्याने
साचलेला कचरा, घाण, झाडझुडपे
काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.

तसेच प्रभाग क्रमांक २६ मधील
सार्वजनिक शौचालय परिसरातही
स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या वेळी भागातील नागरिक उपस्थित
राहून स्वच्छतेसाठी सहकार्य केले.

या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ,
आरोग्यदायी व नागरिकांसाठी
अधिक सुयोग्य झाला आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय