मागे जा

वचनपूर्ती – हँडपंप बसविणे व प्रधानमंत्री आवास योजना


प्रभाग क्रमांक २६ मधील पोवार मळा परिसरात
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला
हँडपंप नागरिकांच्या मागणीनुसार
काढून त्या ठिकाणी नवीन
सबमर्सिबल पंप बसविण्यात आला.

हे काम नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण
पाठपुराव्यामुळे पूर्ण करण्यात आले.

तसेच पोवार मळा वसाहतीमध्ये
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
मिळणाऱ्या अनुदानासाठी
भागातील सुमारे १२० कुटुंबांचे
सर्वेक्षण नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी स्वतः उपस्थित राहून
पूर्ण करून घेतले.

या कामामुळे परिसरातील
नागरिकांना पिण्याच्या पाण्याची
सुविधा उपलब्ध झाली असून
घरकुल योजनेचा लाभ
गरजू कुटुंबांपर्यंत
पोहोचण्यास मदत झाली आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय