इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या
स्वच्छ व सुंदर वॉर्ड स्पर्धेत सहभाग घेत
प्रभाग क्रमांक २६ व २७ मध्ये
स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.
या अभियानामध्ये नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर,
नगरसेवक श्री. युवराज माळी
आणि युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली
भागातील नागरिक, महिला, युवक
तसेच इचलकरंजी नगरपरिषदेतील
सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्या
सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या उपक्रमांतर्गत रस्ते, गल्ल्या,
सार्वजनिक परिसर, गटारी,
कचरा कोंडाळे साफ करून
नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत
जागृती करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये इचलकरंजी नगरपरिषदेने
घेतलेल्या मूल्यांकनात
प्रभाग क्रमांक २६ ला प्रथम
आणि प्रभाग क्रमांक २७ ला
द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
या यशामध्ये सर्व नागरिक,
स्वच्छता कर्मचारी व
सहभागी कार्यकर्त्यांचा
मोलाचा वाटा आहे.