मागे जा

मुलांच्या कला-गुणांना प्रोत्साहन


क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे,
जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर
आणि जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर
यांच्या वतीने आयोजित शालेय योगासन स्पर्धेमध्ये
प्रभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेसाठी नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
आणि युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी विशेष पुढाकार घेऊन
विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य,
प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचा उद्देश मुलांमधील
कला, क्रीडा व योगासनातील
गुणांना वाव देणे, त्यांचा
आत्मविश्वास वाढवणे तसेच
शारीरिक व मानसिक विकास
घडवून आणणे हा आहे.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये
शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास
व आरोग्याविषयी जागरूकता
वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय