इचलकरंजी शहरातील जुनी मस्जिद परिसरात
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या पुढाकाराने रमजान महिन्यानिमित्त
रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये
सामाजिक ऐक्य, सलोखा व बंधुभाव
वाढवणे हा होता. या इफ्तार कार्यक्रमात
गार्डन कॉर्नर युवक मंडळ, काँग्रेस कमिटी,
गोवाण ग्रुप, नितीन लायककर युवा मंचचे सदस्य
तसेच परिसरातील मुस्लिम व हिंदू बांधव
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सर्वांनी एकत्र येत
रोजा इफ्तार करून सामाजिक
एकात्मतेचा संदेश दिला.
या सामाजिक उपक्रमामुळे
धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन
मानवतेचे नाते अधिक घट्ट
होण्यास मदत झाली आहे.