केंद्र व राज्य सरकार (ग्रामीण) यांच्या
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत
(नागरी प्रकल्प) “स्तनपान सप्ताह”
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत
प्रभाग क्रमांक २६ मधील अंगणवाडी
क्र. २०, २१, २२, २५ व २७ तसेच
योग्राम हत्ती चौक येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन
युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या हस्ते झाले.
या वेळी इचलकरंजी विभागाच्या
सौ. रंजना केंजे मॅडम,
डॉ. सौ. वैशाली काटकर (स्त्रीरोग तज्ञ)
यांच्या मार्गदर्शनाखाली
२०० ते २५० गर्भवती महिलांची
शारीरिक तपासणी, रक्तगट तपासणी
तसेच स्त्री आरोग्य विषयक
समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
यांनी विशेष पुढाकार घेऊन
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
सातत्याने सहकार्य केले.
या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये
स्तनपानाचे महत्त्व, आरोग्यविषयक
जागृती वाढली असून
गर्भवती महिलांच्या आरोग्य
संरक्षणास मोठी मदत झाली आहे.