श्री. अनिरुद्ध बापू उपासना – सामाजिक कार्यात सहभाग
कबनूर, ता. हातकणंगले येथे महापूर परिस्थिती निर्माण होऊन
तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
तसेच अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
या पार्श्वभूमीवर श्री. अनिरुद्ध बापू उपासना केंद्र, मुंबई
व इचलकरंजी शहर अनिरुद्ध बापू उपासना केंद्र
यांच्या वतीने गावात जाऊन पूरग्रस्त लोकांना
दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत
लहान मुलांना कपडे,
महिलांना साड्या,
पुरुषांना कपडे, स्वेटर, टॉवेल
अशा विविध आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
तसेच अनिरुद्ध बापू उपासना केंद्र, इचलकरंजी
यांच्या वतीने पोहाळे तर्फे बोऱगाव,
ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
येथे केंद्रामार्फत गावकऱ्यांना
हायजिन साबण, दंतपावडर,
जलशुद्धी औषधे,
त्वचारोगासाठी औषधे
इत्यादी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी
सर्व उपासक व केंद्रातील सेवेकऱ्यांनी
मोलाचे सहकार्य केले.