प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत सामाजिक बांधिलकी
जपत नागरिकांच्या आरोग्य व कल्याणासाठी
विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त
कै. दिलीप आण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट
आणि डॉ. अशोक काजवे हॉस्पिटल यांच्या
संयुक्त विद्यमाने प्रभागामध्ये
नॉर्मल प्रसूती (डिलिव्हरी) व
सिझेरियन प्रसूती (डिलिव्हरी) सेवा
मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत सुमारे ४० गरजू महिलांना
मोफत प्रसूती सेवा देऊन
त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.
तसेच दि. २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त
कै. दिलीप आण्णासाहेब लायकर चॅरिटेबल ट्रस्ट,
रहिमान फाउंडेशन, मुस्लिम समाज बांधव,
आर.टी.आर. सेंटर तसेच
आर.जी.एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
महिला रुग्णांना साड्या,
पुरुष रुग्णांना कपडे व ब्लँकेट
तसेच एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या
लहान मुलांना कपडे व खाऊ
मोफत वाटप करण्यात आले.
या सर्व उपक्रमांचे आयोजन
नगरसेविका सौ. सायली नितीन लायकर
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायकर
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
समाजातील गरजू घटकांपर्यंत
आरोग्य सेवा व मदतीचा हात
पोहोचवणे हेच आमचे सामाजिक कर्तव्य
या उपक्रमांमधून अधोरेखित झाले.