समाजातील धार्मिक, सामाजिक व
नागरी गरजांची जाणीव ठेवत
प्रभाग क्र. १३ मध्ये विविध
सामाजिक बांधिलकीचे उपक्रम
राबवण्यात आले.
रेंदाळ येथील श्री विठ्ठल
विरदेव मंदिर बांधकामासाठी
कै. दिलीप आण्णासाहेब लायकर
चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत
आर्थिक मदत देण्यात आली.
श्री संतुबाई व नामदेव देवालय,
गोंधळी समाज गोंधळी गल्ली
मंदिर बांधकामासाठी
कै. दिलीप आण्णासाहेब लायकर
चॅरिटेबल ट्रस्ट व युवा नेते
श्री. नितीन दिलीप लायकर
यांच्या पुढाकारातून मंदिर
कमिटीला आर्थिक सहाय्य
सुपूर्द करण्यात आले.
इचलकरंजी शहर बस स्टँड
रिक्षा स्टॉप सुशोभीकरणासाठी
कै. दिलीप आण्णासाहेब लायकर
ट्रस्ट मार्फत मदत करण्यात आली.
सकल मराठा समाज,
इचलकरंजी यांच्या वतीने
एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
छत्रपती संभाजीराजे यांच्या
आमरण उपोषणास जाहीर
पाठिंबा देऊन सामाजिक
एकजुटीचे दर्शन घडवण्यात आले.
या सर्व उपक्रमांमधून
धार्मिक कार्य, सार्वजनिक सुविधा,
समाजहित व सामाजिक ऐक्य
जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.