मागे जा

कोरोना साथीच्या काळात नागरिकांसाठी राबवलेले आरोग्य व मदत उपक्रम


कोरोना महामारीच्या
अत्यंत कठीण काळात
प्रभाग क्र. १३ मधील
नागरिकांच्या आरोग्य
आणि सुरक्षिततेसाठी
विविध उपाययोजना
राबविण्यात आल्या.

नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर यांच्या
पुढाकाराने व
के. दिलीप आण्णासाहेब
लायकर चॅरिटेबल ट्रस्ट
यांच्या माध्यमातून
भागात व्यापक प्रमाणावर
आरोग्य व मदत कार्य
राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत –
• १४०० नागरिकांचे
मोफत लसीकरण करण्यात आले
• १००० गरजू कुटुंबांना
धान्य व अन्नसामग्री
स्वरूपात मदत देण्यात आली
• संपूर्ण भागात
नियमित औषध फवारणी
करण्यात आली
• घरोघरी जाऊन
मोफत मास्कचे वाटप
करण्यात आले

या सर्व कामांसाठी
आरोग्य विभाग,
स्थानिक स्वयंसेवक
आणि नागरिकांचे
मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमांमुळे
कोरोना प्रादुर्भाव
आटोक्यात आणण्यास
मदत झाली व
नागरिकांना मोठा
आधार मिळाला.

— नगरसेविका
सौ. सायली नितीन लायकर

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय